फक्त दोन गुंठ्यात शेवाळ शेती करून कमवा 40 ते 50 हजार रुपये महिना.
Spirulina farming:-
अल्पभूधारक शेतकरी आहात किंवा जमीन कमी आहे तर आपण फक्त दोन ते तीन गुंठ्यात शेवाळ शेती करून 40 ते 50 हजार रुपये महिना कमावू शकता, कसे यासाठी संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा.
स्वस्तात बियाणे, कमी खत, कमी खर्च, कमी मजूर, कमीकिडींचा प्रादुर्भाव आणि बाजारभाव चांगला मिळेल अशा व्यवसाय विषयक माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
हा व्यवसाय किंवा शेती म्हणजे शेवाळ शेती इंग्लिश मध्ये याला स्पिरुलिना फार्मिंग असही म्हटलं जातं.
हा व्यवसाय तुम्ही घरी हौद तयार करून किमान दोन ते तीन गुंठे मोठा हौद तयार करून शेती करू शकता.
शेवाळाचे आरोग्यविषयक फायदे (Spirulina Health Benefits) :-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते.
रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करते.
कुपोषण कमी करण्यास मदत करते.
शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यास मदत करते.
अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करते.
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते.
वजन कमी करण्यासाठी मदत करते.
एकाग्रता सुधारण्यासाठी मदत करते.
अजूनही बऱ्याच आरोग्यदायी फायद्यामुळे शेवाळाच्या गोळ्यांची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या संधीचा पुरेपूर लाभा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.
शेवाळ शेती ही प्रामुख्याने खुली केली जाते किंवा आत मध्ये म्हणजे पॉलिहाऊस मध्ये किंवा इंग्लिश मध्ये indoor कल्टिवेशन असंही म्हटलं जातं.
तर आज आपण indoor cultivations’ विषयी माहिती घेणार आहोत कारण दोन्हींचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.
मुद्दे:-
का करावी ?
कशी करावी ?
का करावी:-
ही शेती तुम्ही कमी जागेत करू शकता .
मजुरीचा खर्चही कमी करावा लागतो .
कीड नियंत्रण करताना खर्च कमी लागतो .
औषधांवर होणारा खर्च कमी होतो .
खताचा खर्च कमी करावा लागतो .
कमी दिवसांमध्ये पिकाच्या उत्पादनास सुरुवात होते .
बाजारभाव चांगला मिळतो परिणामी पैसे जास्त कमावू शकता .
कशी करावी:-
पॉलिहाऊस च्या आत मध्ये शेवाळ शेती (spirulina farming) करावी कारण प्रदूषित होण्याचा प्रमाण कमी आहे .
धुळीचा व शेवाळ पिकाचा संपर्क कमी प्रमाणात येतो पावसाचं पाणी हे शेवाळ शेतीच्या पाण्यात मिसळत नाही कीटक व किडींच्या संपर्क रोखण्यात मदत होते शेवाळ शेतीसाठी लागणारा वातावरण निर्मिती करण्यास मदत होते
शेवाळ शेती समोरील आव्हाने (Spirulina farming problems):-
शेवाळ शेती indoor cultivation तुम्ही करणार असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात भांडवल म्हणजे पैसा लागेल.
उत्पादित झालेला माल जर तुम्ही स्वतः तयार करून विक्री करणार असाल तर तुम्हाला अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी लागेल कारण उत्पादित झालेला माल हा लोक सेवन करणार आहेत .
बाजार (marketing) :-
उत्पादित झालेला माल विकायचा कुठे हे प्रामुख्याने मोठा आव्हान असेल त्यासाठी तुम्हाला सामाजिक माध्यमातून फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम यांचा वापर करून घ्यावा लागेल या माध्यमांचा वापर करून लोकांमध्ये शेवाळ्याची पावडर आहे किंवा ज्या गोळ्या आहेत त्या आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर आहेत याचा महत्त्व पटवून द्यावे लागेल . त्या गिऱ्हाईकांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी साखळी उभी करावी . हा व्यवसाय करण्यासाठी संयम अतिशय महत्त्वाचा आहे .
याशिवाय ह्या उत्पादनाची निगेटिव्ह मार्केटिंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे, नकारात्मक बाजारीकरण हे उत्पादनाचे कसे टाळावे हे प्रामुख्याने बघावे लागेल, म्हणजे काय ते समजून घ्या उदाहरणार्थ आपण जे उत्पाद तयार करणार आहोत ते पावडर स्वरूपात किंवा गोळ्यांच्या स्वरूपात असणार असून लोकांचा एक गैरसमज असा होतो की हे आजारी माणसाने घ्यावयाचे अन्न असून निरोगी माणसाने घ्यावयाचे नाही असा होतो.
तर हे टाळण्यासाठी तुम्हाला लोकांना हे पटवून द्यावे लागेल की हे सर्वसाधारण खाद्यपदार्थ प्रमाणे किंवा हे दररोजच्या आहारात अन्न घेतो नेहमी निरोगी तरुण राहण्यासाठी घ्यावयाचे प्रथिन युक्त अन्न आहे . हे घेण्यासाठी कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याची आवश्यकता अजिबात नाही जसं की आपण पालेभाज्या, फळे, खारीक, खजूर, बदाम, काजू इत्यादी आपण सेवन करतो तसे यातून मोठ्या प्रमाणात शरीराला प्रथिने,कॅल्शियम, सुक्ष्म अन्नद्रव्ये शरीराला मोठ्या प्रमाणात मिळतात हे लोकांना तुम्हाला पटवून द्यावे .
प्रशिक्षण :-
हा व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण हे घ्यावे .प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारतर्फे ही योजना राबवण्यात येतात त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता .
पाणी कोणते वापरावे:-
शेवाळ शेतीसाठी प्रामुख्याने घ्यावयाची काळजी म्हणजे पाणी कोणते वापरावे ?
पिण्यायोग्य पाणी शेवाळ शेतीसाठी वापरावे. ज्या पाण्याचा पीएच किंवा ज्याला सामू असे म्हणतात तो 6.7 ते 7.1 इतका पाहिजे .
बियाणे :-
शेवाळ शेतीसाठी लागणारे बियाणे किंवा कल्चर किंवा शेवाळ स्लरी हे तुम्हाला विकत घ्यावे . त्या त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला गुगल वर मिळेल .
खते :-
शेवाळ शेतीसाठी मीठ, सोडियम बायकार्बोनेट, मग्नेशिउम सल्फेट व एनपीके खते ही योग्य प्रमाणात तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावी .
तपासणी :-
उत्पादित झालेला माल हा तपासून घेतला जातो मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून मालाचा दर्जा तपासण्यासाठी कारण कि उत्पादित झालेला माल खाण्यास योग्य आहे की नाही हे प्रामुख्याने तपासणे गरजेचे आहे .